प्रति,
श्री. आर आर पाटील,
मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य
दिनांक -
विषय - मुंबईतील अंधेरी पश्चिमेच्या इन्फ़ीनिटी मॉल मधे पत्रकाराला खासगी सुरक्षा रक्षकांकडून झालेल्या बेदम मारहाणीबाबत...
मा. महोदय,
आपणांस हे पत्र अत्यंत वेदनादायक स्थितीत लिहावे लागत आहे.
आपण जाणताच की, मुंबईतील अंधेरी पश्चिमेच्या इन्फ़ीनिटी मॉल मधे आमंत्रणावरून वार्तांकन करण्यास गेलेल्या 'इंडिया टीवी' चा पत्रकार वसीम अख्तर यास इन्फ़ीनिटी मॉलच्या सुरक्षेसाठी तैनात खासगी सुरक्षा रक्षकांकडून मॉल परिसरात शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २००८ रोजी बेदम मारहाण झाली.
या प्रकरणी आम्हाला आपणाकडून वेगवान न्यायाची अपेक्षा आहे.
संघटनेच्यावतीने आम्ही आपणाकडे मागणी करतो की,
सदर पत्रकार अणि कैमरामैन यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या विनायाभंगाच्या तक्रारीवर न्यायोचित मार्गाने निकाल लावावा, तसेच ही तकरार खोटी सिद्ध झाल्यास सम्बंधित महिलेवर कठोर कार्रवाई व्हावी।
याशिवाय,
१) उपरोल्लेखित पत्रकाराला मारहाण करणा-या सर्व खासगी सुरक्षा रक्षकांवर कठोर कार्रवाई व्हावी.
२) मारहाण करणार्या सर्व खासगी सुरक्षा रक्षकांच्या मूलभूत बाबी जसे मुंबईतील शिधावाटप पत्रिका, सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास जरूरी शारीरिक पात्रता व अनुभव याची तपासणी करून अपात्र व्यक्तीवर तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.
३)संबंधित सुरक्षा रक्षक ज्या सिक्युरिटी एजन्सीशी संबंधित आहेत त्या एजन्सीचा परवाना रद्द व्हावा. सदर सुरक्षा रक्षकांच्या उद्धट आणि अरेरावीपूर्ण वागण्यामुळे मॉलमधे खरेदी करण्यास जाणार्या ग्राहकांचीही असंख्य वेळा गैरसोय झाल्याचे समजते.
४) तसेच, यानिमित्ताने मुंबईतील सुरक्षा एजन्सीची फेरतपासणी व्हावी व बोगस आणि अपात्र एजन्सीजवर कायद्याचा बडगा उगारून अशांना खासगी सुरक्षा सेवा पुरवण्यापासून रोखावे.
५) अखेरचे मात्र तितकेच महत्वाचे -
इन्फ़ीनिटी मॉल इथं मारहाण होत असताना बघ्याची भूमिका घेणार्या पोलीस शिपायांवर तसेच संपूर्ण प्रकरणादरम्यान मा. गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबाबत नकारात्मक शेरेबाजी करणार्या व तक्रारदारांचे खच्चीकरण करणार्या पोलीस उप निरीक्षक जीतेन्द्र पाटील यांना सेवेतून निलंबीत करावे.
मा. महोदय आपण जाणताच की, टीवी जर्नलिस्ट असोसिएशन ही राज्यातील 'टीवी जर्नलिस्ट'ची एकमेव आणि अधिकृत संघटना आहे, ज्याचे २० वृत्तवाहिन्यांचे सुमारे ४०० प्रतिनिधी या संघटनेचे सदस्य आहेत. अशा संघटनेच्या मागण्यांवर आपण गांभीर्याने विचारकरून तातडीने पावलं उचलाल अशी आम्हांस अपेक्षा आहे.
धन्यवाद,
आपला
प्रसाद काथे,
सरचिटणीस
टीवी जर्नलिस्ट असोसिएशन
९८२०४ २३३४९
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें