प्रति,
मुख्य सुरक्षा अधिकारी,
मंत्रालय,
मुंबई.
दिनांक - १४ ऑगस्ट २००८
विषय- 'स्वातंत्रदिन ध्वजारोहण' थेट प्रक्षेपणाबाबत,
मा. महोदय / महोदया,
आपण जाणताच की, 'टीवी जर्नलिस्ट असोसिशन' ही मुंबईतील दूरचित्रवाणी वाहिन्यांमधील पत्रकारांची एकमेव अधिकृत संघटना आहे. मुंबईतील २० पेक्षा अधिक न्यूज चॅनलचे ३९० प्रतिनिधी आणि कॅमेरामन या संघटनेचे सदस्य आहेत.
तरी, या संघटनेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मंत्रालयात आयोजित सोहळ्याचे थेट प्रक्षेपण व वार्तांकन सुलभ व्हावे या हेतूने काही उपाययोजना करण्याची विनंती या पत्राद्वारे, आम्ही आपणांस करीत आहोत.
१) सोहळ्याचे वार्तांकन करणा-या 'टीवी जर्नलिस्ट' साठी योग्य जागा आखून देणे.
२) सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी ओबी वॅन ते कॅमेरॅपर्यंत केबल टाकण्यास अनुमती देणे.
या सर्व उपाय योजनांबाबत,
१) मा. माहिती महासंचालक,
२) मा. माहिती संचालक,
३) मा. उप मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी,
यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे.
तरी, या उपाययोजना पूर्ण करत आपण 'टीवी जर्नलिस्ट' ला नेहमीप्रमाणे संपूर्ण सहकार्य कराल ही अपेक्षा आहे.
धन्यवाद,
आपला,
प्रसाद काथे
सरचिटणीस
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें